झहीर खान तयार करणार प्रतिभावंत क्रिकेटपटूची फौज

zaheer-khan
मुंबई – देशातील युवा प्रतिभावंत खेळाडूंसाठी व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खान स्वतंत्र क्रिकेट लीग द फेरिट क्रिकेट बॅशची सुरुवात करत आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना एफसीबीचे सहसंस्थापक झहीर खान म्हणाला की, या लीगमध्ये १५ वर्षापुढील खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात येणार आहे. यासाठी खेळाडूंची चाचणी होणार आहे. काही संघ यासाठी तयार करण्यात येणार आहे. सहा महिन्याचा अवधी लागणार आहे. हे व्यासपीठ क्रिकेटमध्ये करिअर घडविण्यासाठी चांगले असल्याचे झहीरने सांगितले.

पुढे बोलताना झहीर खान म्हणाला, की जे खेळाडू पुढे येऊन क्रिकेटमध्ये करिअर घडवू इच्छिता अशा मुलांना हा मंच आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. स्टार खेळाडू ख्रिस गेल, मुथय्या मुरलीधरन, प्रवीण कुमार, अन्य खेळाडू यात यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. एफसीबीचे संस्थापक जसमीत भाटिया म्हणाले की ४९९ रुपये यासाठी एकूण फी ठेवण्यात आली आहे. ज्यातील पन्नास टक्के रक्कम कॅश बॅक असणार आहे. हे प्रशिक्षण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे. प्रत्येक राज्यातून १४ ते १६ खेळाडूंची निवड करण्यात येईल. भविष्यात क्रिकेट अकादमी काढण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment