आयसीसीचे सीईओ भारताच्या पराभवावर बरळले

dave-richardson
दुबई – न्यूझीलंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला. हा सामना न्यूझीलंडने ८ गडी राखून दिमाखात जिंकला. आयसीसीचे सीईओ डेव रिचर्डसन यांनी भारताच्या या पराभवावर अनपेक्षित प्रतिक्रिया दिली आहे.


वाद विवादापासून दूर राहणारे रिचर्डसन यांना भारताच्या पराभवानंतर काही पत्रकारांनी न्यूझीलंडच्या विजयावर प्रतिक्रिया घेतली. त्यावर म्हणीच्या स्वरुपात त्यांनी टीका केली. “हर कुत्ते का दिन आता है” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे.

रिचर्डसन काही दिवसांपूर्वी एका संमेलनात म्हणाले, की विश्वचषक २०१९ सालच्या विश्वचषकात मागील दहा वर्षात सर्वश्रेष्ठ संघ उतणार आहेत. भारत सध्याच्या घडीला चांगले खेळत आहे. तो किताबाचा प्रबळ दावेदार आहे. इंग्लंड सर्वश्रेष्ठ एकदिवसीय संघ आहे. आफ्रिकेचा संघ चांगला खेळत आहे. विश्वचषक कोण जिंकणार यांची भविष्यवाणी करणे अवघड असल्याचेही ते म्हणाले होते.

Leave a Comment