व्हिडीओ; लग्नमंडपात चक्क रोड रोलर घेऊन पोहोचला नवरदेव

groom
सर्वसाधारणपणे आपण लग्नात नवरदेवाला घोड्यावर बसून लग्नमंडपात पोहचलेले पाहिले आहे. याला अपवाद ठरण्यासाठी काही जण थोड्या हटके स्टाईलमध्ये लग्नमंडपात एंट्री मारतात. काही महिन्यापूर्वीच एक नवरीमुलगी चक्क बुलेटवर बसुन लग्नमंडपात दाखल झाल्याची बातमी आपण ऐकली होती. पण बंगालमधील एका तरुणाने फक्त विचार केला नाही तर थेट रोड रोलर घेऊन लग्नमंडपात पोहोचला. सध्या सोशल मीडियावर या नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या तरुणाचे नाव अरका पात्रा असे आहे. माझ्या लग्नात काहीतरी वेगळे मला करायचे होते. मला काहीतरी असामान्य करत प्रवेश करायचा असल्याचे त्याने सांगितलं आहे. तो पुढे म्हणाला की, एखाद्या विंटेज कारमधून लग्नाला जाण्याचे स्वप्न आपण नेहमी पाहिले होते. पण एक जुना रोड रोलर मला दिसला आणि त्याच्यावरुन लग्नमंडपात एंट्री करण्याचे ठरवले. जास्त भाडेही या रोड रोलरसाठी न द्यावे लागल्यामुळे हे खिशा परवडणारेही होते असे अरका पात्राने सांगितले. त्याची ही कल्पना होणारी पत्नी अरुंधती हिलादेखील प्रचंड आवडल्यामुळे कोणताही विरोध तिने केला नाही.

Leave a Comment