सोनमने चित्रपटात काम करण्यासाठी ठेवली ‘ही’ अट

sonam-kapoor

मुंबई – अभिनेत्री सोनम कपूरने चित्रपटात काम करण्यासाठी एक अट ठेवली आहे. ‘मुन्नाभाई 3’ या चित्रपटात सोनम कपूरची वर्णी लागली आहे. मात्र, सोनमने यासाठी एक अट ठेवली आहे.

एका कार्यक्रमादरम्यान या चित्रपटात भूमिका साकारण्याविषयी तिला प्रश्न विचारला असता, आपण एका अटीवर ‘मुन्नाभाई 3’ मध्ये काम करण्यास तयार असल्याचे सोनमने म्हटले आहे. ही अट ऐकून सर्वच बुचकळ्यात पडले. या चित्रपटाच्या नावात बदल करून ‘मुन्नाभाई’ ऐवजी ‘मुन्नी बहन’ असे केल्यास मी चित्रपटात काम करेल, असे सोनमने म्हटले आहे.

दरम्यान, चित्रपटात अभिनेत्रीच्या भूमिकेला फारसे महत्त्व नसल्याने सोनमने असे उत्तर दिले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान सोनम ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 1 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Leave a Comment