व्हिडीओ; दीपिकासाठी रणवीरचे कायपण…!

deep-veer
रणवीर सिंग व दीपिका पादुकोण हे जोडपे लग्नानंतरही अद्याप चर्चेत आहेत. हे नवदांम्पत्य गुरुवारी रात्री उशीरा मुंबईच्या एका रेस्टारंटबाहेर दिसले. त्यांची बॉन्डिंग यावेळी पाहण्यासारखी होती. त्याचवेळी रणवीरने असे काही केले की, ज्यामुळे अनेकांचे पुन्हा एकदा नवरा असावा तर असा, असे मत पडले आहे.


रेस्टॉरंटबाहेर दीपिका व रणवीर दिसताच, कॅमेऱ्यांची क्लिक सुरु झाली. दीपिकाच्या जीन्सवर याचदरम्यान काहीतरी लागल्याचे रणवीरच्या लक्षात आले. रणवीरने कॅमे-यांची पर्वा न करता आपल्या हातांनी दीपिकाची जीन्स झटकून स्वच्छ केल्यानंतर त्याने दीपिकाला एक जादूची झप्पी देत, तिच्या गालांचे हळुवार चुंबन घेतले. दीपिका रणवीरचा हा अंदाज पाहून चांगलीच हरकली. एक तितकेच गोड हसू तिच्या चेह-यावर पसरल्यानंतर दोघेही हसत हसत आपल्या कारकडे रवाना झालेत. यापूर्वी रणवीर लग्नाच्या रिसेप्शनमध्येही दीपिकाची साडी सावरतांना दिसला होता. तो त्यावेळीही अगदी परफेक्ट पती असल्याचे सिद्ध झाले होते.


रणवीर सध्या आपल्या आगामी ‘गली बॉय’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच्या अपोझिट या चित्रपटात आलिया भट्ट लीड रोलमध्ये आहे. रणवीरचा यापूर्वी आलेला ‘सिम्बा’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाने २५० कोटींची कमाई केली.

Leave a Comment