केवळ वासावरून मृत्यूची चाहूल ओळखते ही युवती !

smell
मनुष्य जेव्हा घडला, तेव्हा निसर्गाने त्याला बुद्धी दिली, भावना दिल्या, अचाट शारीरक क्षमता ही दिल्या. पण याही पुढे जाऊन निसर्गाने जगातील अनेकांना चमत्कारी वाटाव्यात अशा काही विलक्षण शक्तीही दिल्या आहेत. उदाहरणच द्यायचे झाले, तर ‘प्रिमॉनिशन’ या मानसिक शक्तीचे देता येईल. भविष्यामध्ये घडू शकणाऱ्या घटनांचा अंदाज लावण्याची शक्ती निसर्गाने प्रत्येकालाच थोड्याफार प्रमाणात दिलेली असते. पण काही लोकांच्या बाबतीत ही शक्ती इतकी जास्त असते, की हे लोक भविष्यकाळातील काही विशेष घटना आपल्या मनामध्ये स्पष्ट पाहू शकतात. या घटनेतील प्रत्येक बारकावा या व्यक्तींना आधीपासूनच स्पष्ट दिसत असतो. यालाच प्रिमॉनिशन म्हटले जाते. अशाच प्रकारच्या अनेक विलक्षण शक्ती निसर्गाने खूप लोकांना दिल्या आहेत.
smell1
ऑस्ट्रेलिया देशातील मेलबर्न शहरामध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षांच्या आरी कला नामक युवतीलाही निसर्गाने एक विलक्षण शक्ती दिली आहे. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येऊन ठेपला असेल तर तशी जाणीव आरी कलाला होते. एखाद्या व्यक्तीचा वास घेऊन आरी कला त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला असल्याचे सांगू शकते. आरी कलाला तिच्या या विलक्षण शक्तीची जाणीव झाली तेव्हा ती केवळ बारा बर्षांची होती. आपल्या या अजब शक्तीचा वापर आपण कसा करावा, करावा की करू नये याबद्दल आपल्या मनामध्ये सतत संभ्रम असल्याचे आरी कला म्हणते.
smell2
जेव्हा आरी बारा वर्षांची होती, तेव्हा आपल्या अत्यंत आजारी असलेल्या नातेवाईकाला भेटण्यास गेली असता, तिला त्याच्या शरिरातून येणाऱ्या विचित्र गंधाची जाणीव झाली. त्यानंतर लवकरच त्या नातेवाईकाचा मृत्यू झाला. त्यांनतरही अनेकदा इतरही काही लोकांच्या शरीरातून तो विशिष्ट गंध आरीला जाणविला, आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये त्या लोकांचा मृत्यूही झाला. तेव्हापासून त्या विशिष्ट गंधावरून मृत्यूची चाहूल ओळखण्याची शक्ती आपल्याला लाभली असल्याचे आरीच्या लक्षात आले. विशेष म्हणजे हा गंध केवळ आरीलाच जाणवत असे.
smell3
या शक्तीने एखाद्याचा मृत्यू कधी होणार हे जरी आरी सांगू शकत असली, तरी त्या व्यक्तीला मृत्युपासून वाचविण्याची शक्ती आपल्यामध्ये नसल्याचे असमाधान आरीच्या मनामध्ये सतत असते. एखाद्या व्यक्तीचा होणार असलेला मृत्यू जरी आरीला समजला तरी त्याबद्दल ती त्या व्यक्तीला काहीच सांगत नसल्याचे म्हणते. आरी व्यवसायाने मनोवैज्ञानिक असून, तत्पूर्वी एका कंपनीमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करीत असे.

Leave a Comment