राफेल नदाल झाला एंगेज

rafael
स्पेनचा स्टार टेनिसपटू, १७ ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदालने गर्लफ्रेंड मेरी परेनो बरोबर विवाह करण्याचा निर्णय घेतला असून त्यांची एन्गेजमेंट झाल्याचे जाहीर केले गेले आहे. याच वर्षात राफेल आणि मेरी विवाहबद्ध होतील असे समजते. मेरी आणि राफेल गेली १४ वर्षे डेटिंग करत आहेत. ३२ वर्षीय राफेलने मेरीला गेल्यावर्षी रोम प्रवासात प्रपोज केले होते मात्र त्याची घोषणा आत्ता केली गेली.

राफेलने यापूर्वीही विवाहाचे संकेत दिले होते मात्र तो त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फारसा बोलत नाही अथवा सोशल मिडीयावर त्याबद्दल फारशी माहिती देत नाही. त्यामुळे मे महिन्यात राफेलने मेरीला प्रपोज करून आठ महिने उलटले तरी ही बातमी गुप्त होती.

यंदाच्या वर्षाची सुरवात राफेलसाठी फार खास झालेली नाही. त्याला नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम मध्ये नोवाक जोकोविच कडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.

Leave a Comment