डॉन रवी पुजारीला आफ्रिकेत अटक

pujari
छोटा शकील गँग मधील कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आल्याचे समजते. इंटरपोल सेन्ट्रल ब्युरोने क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिव्हिजनच्या मदतीने रवी पुजारीला २२ जानेवारीला बेड्या ठोकल्या. भारत सरकारच्या मोस्ट वाँन्टेड गुन्हेगारामध्ये रवी पुजारीचा समावेश आहे. गेली १५ वर्षे तो फरारी होता.

रवी पुजारीने छोटा शकीलची गँग फुटल्यावर स्वतःची टोळी स्थापन केली होती. त्याने अनेक बॉलीवूड स्टार, उद्योजक, व्यावसायिक, ज्युवेलर्स यांना खंडण्या मागून धमक्या दिल्या असून त्याच्याविरोधात अपहरण, खंडणी मागणे, खून, धमक्या देणे, फसवणूक असे अनेक गुन्हे दाखल आहेत. रवी पुजारीचा ठावठिकाणा बुर्कीना फासो येथे लागला. त्याच्या टोळीतील एका गुंडाला पोलिसांनी पकडून त्याच्याकडून रवीचा ठावठिकाणा मिळविला होता असे समजते. परदेशात राहून तो भारतातील बड्या लोकांना धमकावीत होता.

रविला सेनेगल मध्ये ताब्यात घेतले गेले तेव्हा त्याच्याजवळ अँथनि फर्नांडीस नावाने बनावट पासपोर्ट सापडला. रविला अटक हे भारत सरकारचे मोठे यश मानले जात असून त्याला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले आहे.

Leave a Comment