टीव्हीचा ‘हा’ प्रसिद्ध सेलिब्रेटी अडकला विवाहबंधनात

wedding
टीव्हीचा प्रसिध्द डान्सिंग रियालिटी शो ‘डान्स इंडिया डान्स’चा एक्स कंटेस्टंट प्रिन्स गुप्ता लग्नबंधनात अडकला आहे. गर्लफ्रेंड सोनम लाडिया सोबत विवाहबंधनात अडकला आहे.
prince-gupta
गुजरातमध्ये या दोघांचे लग्न नुकतंच पार पडले. गेल्या अनेक वर्षापासून प्रिंस आणि सोनम रिलेशनशिप मध्ये होते. याच्या लग्नाचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये दोघांचीही रोमांटीक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
prince-gupta1
प्रिन्सच्या लग्नात प्रसिध्द कोरियोग्राफर फिरोज खाननेही हजेरी लावली होती. “दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे”. अशा शब्दांत फिरोज खान यांनी आपला आनंद व्यक्त केला.

Leave a Comment