विद्यार्थ्याच्या मध्यान्ह भोजनात खिचडीऐवजी चक्क साप

snake
नांदेड: नांदेड जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात चक्क साप आढळल्याने एकच खळबळ उडाली. हा धक्कादायक हदगाव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी प्रकार घडला. सुदैवाने खिचडी मुलांना देण्यापूर्वीच त्यामध्ये साप असल्याचे आढळल्याने मोठा अनर्थ टळला. मुलांना खिचडी देण्यापूर्वी एका शिक्षकाने ती तपासून पाहत असताना त्यामध्ये साप असल्याचे दिसून आले. त्यानंतप एकच खळबळ उडाली.

धक्कादायक म्हणजे हा साप एका विद्यार्थ्याच्याच ताटात खिचडी वाढत असताना आढळल्यामुळे खिचडी वाटप थांबवण्यात आले. ही खिचडी कोणत्याही विद्यार्थ्यांना खाऊ न दिल्याने, मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या प्रकारानंतर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच नांदेड शिक्षण विभागाचे पथक शाळेत दाखल झाले. याप्रकाराबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Leave a Comment