बागेमध्ये खड्डा खणताना झाले अनेक वर्षांपूर्वीचे रहस्य उघड

ring
काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रिया देशातील होहेन्थर्न शहरामध्ये राहणारा टायटस फर्मिन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बागकाम करण्यात व्यस्त होता. काही नवीन रोपे लावण्यासाठी खड्डा खणण्याचे काम सुरु होते. त्याचवेळी एक अतिशय अजब घटना घडली. टायटस बागेमध्ये खड्डा खोदत असताना त्याला अचानक मातीमध्ये पुरलेली सोन्याची अंगठी, एका दुर्घटनाग्रस्त विमानाचे काही अवशेष आणि काही मानवी हाडे सापडली. या वस्तू या ठिकाणी असतील अशी कल्पनाही कधी टायटसने कली नव्हती. त्यामुळे अचानक या सर्व गोष्टी समोर आल्याने गोंधळून गेलेल्या टायटसने त्वरेने स्थानिक प्रशासनिक अधिकाऱ्यांना घडलेल्या प्रकारची सूचना दिली.
ring1
घडल्या प्रकारची सूचना मिळताच प्रशासनिक अधिकारी टायटसच्या घरी पोहोचले, व त्याच्या बागेमध्ये सापडलेल्या सर्व वस्तू ताब्यात घेऊन पुढील परीक्षणासाठी त्यांनी लॅबोरेटरीमध्ये पाठवून दिल्या. या वस्तूंचे परीक्षण केले गेल्यानंतर जो रिपोर्ट लॅबने पाठविला, तो पाहून सर्वांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. लॅबच्या रिपोर्टनुसार दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानाचे अवशेष दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये अचानक गायब झालेल्या विमानाचे असून, त्याबरोबर सापडलेली मानवी हाडे व सोन्याची अंगठी त्या विमानाचा वैमानिक लॉरेन्स डिक्सन यांची असल्याचे निष्पन्न झाले.
ring2
ज्या विमानाचे हे अवशेष होते ते विमान २४-ब्लॅक एव्हीयेटर विमान असून, हे विमान १९४४ साली एक गुप्त मिशनवर असता अचानक गायब झाले. त्यानंतर या विमानाचे किंवा यातील वैमानिकांचे काय झाले हे समजू शकले नाही. तसेच या विमानाचे अवशेषही तेव्हा सापडले नव्हते. त्यानंतर इतकी वर्षे उलटून गेल्यानंतर टायटसच्या बागेमध्ये या विमानाचे आणि वैमानिकाचे अवशेष सापडले. या अवशेषांच्या सोबत लॉरेन्स डिक्सन यांची सोन्याची अंगठी देखील सापडली असून, संरक्षण मंत्रालयाने ही अंगठी डिक्सन यांची कन्या मार्ला अँड्र्यू यांच्याकडे सुपूर्त केली आहे. मार्ला सध्या ७६ वर्षांच्या असून, त्यांच्यासाठी ही अंगठी त्यांच्या आजवरच्या जीवनातील सर्वात अमूल्य भेट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment