कार्तिक-कृतीच्या ‘लुका छुपी’मधील नवे गाणे रिलीज

luka-chuppi
कार्तिक आर्यन आणि कृती सेनन ही जोडी आगामी ‘लुका छुपी’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी देखील चांगली प्रतिसाद दिला. या चित्रपटात कार्तिक आणि कृती यांच्या रोमँटिक कॉमेडीमध्ये त्यांच्या लग्नाची मनोरंजक कथा दाखवण्यात आली आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘पोस्टर लगवा दो’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

अक्षय कुमारच्या ‘अफलातून’ चित्रपटातील ‘पोस्टर छपवा दो’ या गाण्याचा वापर ‘लुका छुपी’ या चित्रपटात करण्यात आला आहे. १९९७ मध्ये ‘अफलातून’ हा चित्रपट रिलीज झाला होता. अक्षय आणि उर्मिला मातोंडकरची यात प्रमुख भूमिका होती. कृती आणि कार्तिकचा धमाल डान्स या गाण्याच्या रिक्रियेटेड व्हर्जनमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान अक्षय कुमार, कार्तिक आणि कृतीचा एक व्हिडिओ या गाण्याच्या रिलीजपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तिघेही या गाण्यावर धमाल डान्स करताना पाहायला मिळाले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कार्तिक आणि कृती यांचा ‘लुका छुपी’ चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment