कुंभमेळ्यामध्ये ‘काटोंंवाले बाबा’ ठरत आहेत भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र

kato-wale-baba1
उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज या ठिकाणी सध्या कुंभमेळ्याचे महापर्व सुरु आहे. या मेळ्यासाठी केवळ देशभरातूनच नाही, तर जगभरातून हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे. त्याचबरोबर देशातील अनेक साधूसंत देखील मोठ्या संख्येने या मेळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. या साधू संतांमध्ये अनेक अजब साधू, भाविकांच्या केंद्राचे आकर्षण ठरत आहेत. कोणी साधू सोन्याच्या दागिन्यांनी मढले आहेत, तर कोणी भाविकांकडे दक्षिणा म्हणून स्वतःच्या गाडीसाठी पेट्रोल मागताना दिसत आहेत. या सर्व साधूंच्या सोबतच आणखी एक साधू भाविकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
kato-wale-baba2
या साधूंना ‘काटोंवाले बाबा’ या नावाने भाविक ओळखत असून, हे साधू बाबा काट्यांच्या शय्येवर निजलेले पहावयास मिळतात. अतिशय तीक्ष्ण काट्यांवर झोपलेल्या या साधू महाराजांना पाहून भाविक आश्चर्यचकित होत आहेत. हे साधू महाराज सदैव काट्यांच्या शय्येवर का झोपून असतात यामागे एक रोचक कथा असून या कथेचा संबंध साधू महाराजांच्या आयुष्यात अठरा वर्षांपूर्वी घडून गेलेल्या एका घटनेशी आहे. याच घटनेचे प्रायश्चित्त करण्यासाठीच हे साधू महाराज काट्यांच्या शय्येवर झोपून रहात असल्याचे म्हटले जाते. ही घटना नक्की काय आहे याबद्दल साधू महाराजांनी मौन साधले असून, हे घटना नेमकी काय आहे याचे ज्ञान कोणाला नाही.
kato-wale-baba3
हे साधू बाबा प्रत्येक कुंभ मेळ्यामध्ये सहभागी होत असून, देशामध्ये इतरही कोठे मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्ये आयोजित होत असल्यास हे साधू महाराज तिथेही हजेरी लावीत असतात.
kato-wale-baba4
या साधू महाराजांचे नाव लक्ष्मण राम असून, हे काट्यांच्या शय्येवर झोपत असतात, त्यामुळे त्यांचे नाव ‘काटोंवाले बाबा’ पडले आहे. या साधू महाराजांना दक्षिणेमध्ये जितके पैसे मिळतात ते सर्व पैसे हे साधू महाराज मथुरेतील गोशाळेमध्ये दान करीत असतात.

Leave a Comment