आमीरपुत्र जुनैदचे बॉलीवूड लाँचिंग लवकरच

junaid
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बॉलीवूड मध्ये ख्याती मिळविलेल्या आमीर खान याचा मुलगा जुनैद लवकरच बॉलीवूड मध्ये एन्ट्री करेल असे समजते. आमीर खानच्या होम प्रोडक्शन रूबरू रोशनी या चित्रपटासंदर्भात मुलाखत देत असताना स्वतः आमीरने जुनैद बॉलीवूड मध्ये येत असल्याचे सांगितले.

आमीर म्हणाला, त्याचे आत्तापर्यंतचे काम समाधानकारक आहे. तो ज्याप्रकारे कथानक निवड करतोय ती पद्धत माझ्यापेक्षा नक्कीच वेगळी आहे. मात्र त्याला अभिनेता म्हणून काम सुरु करण्याअगोदर एक अट घातली आहे. ती म्हणजे स्क्रीन टेस्ट पास झाल्याशिवाय माझ्याकडून त्याला अभिनेता बनण्यासाठी प्रोत्साहन मिळणार नाही.

जुनैद गेली तीन वर्षे थियेटर करतोय आणि त्याने अभिनयाचे रीतसर प्रशिक्षण घेतले आहे. आमीरच्या मते कोणताच अभिनेता कायम हिरो म्हणून काम करू शकत नाही त्यामुळे जुनैदने कॅरेक्टरही साकारली पाहिजेत. त्याला चित्रपटांची चांगली जाण आहे. माझी बयोपिक बनली तर तो त्यात नक्कीच माझी भूमिका करू शकेल.

Leave a Comment