किंजल पारिखसोबत विवाहबद्ध झाला हार्दिक पटेल

hardik-patel
गुजरात – आपली बालमैत्रिण किंजल पारिखसोबत पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल लग्नबंधनात अडकला. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील दिग्सार गावातील मंदिरात रविवारी त्यांचे लग्न झाले. त्यांचा विवाहसोहळा बहुचरमाता कुलदेवी मंदिरात पारंपरिक पद्धतीने पार पडला. आता लग्नानंतर आम्ही दोघेही एकत्र मिळून समाजाच्या हितासाठी लढू, अशी प्रतिक्रिया हार्दिक पटेलने दिली.

गुजरातमधील पटेल समाजाच्या आरक्षणासाठी २०१५ साली उभा राहिलेल्या पाटिदार आंदोलनामुळे हार्दिक पटेल पहिल्यांदा चर्चेत आला होता. त्याने त्यानंतर राज्यभरात अनेक विरोध प्रदर्शन, रॅली काढून सरकारविरोधात आवाज उठवला होता. तो गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पंतप्रधान मोदी आणि भाजपविरोधात आवाज उठवत आला आहे. त्याची सेक्स टेप काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला होता. भाजपचे हे घाणेरडे राजकारण असल्याची टीका यावर हार्दिक पटेलने केली होती.

Leave a Comment