हिंदू मुलीवर हात टाकणाऱ्याचे हातच कलम करणार, केंद्रीय मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य

anant-kumar-hegde
कोडागु – नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारे केंद्रीय राज्यमंत्री अनंत कुमार हेगडे यांनी यावेळेस देखील वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी कर्नाटकातील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा एकदा नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. त्यांनी कर्नाटकातील कार्यक्रमात हिंदू मुलीवर हात टाकणाऱ्याचे हातच राहणार नाहीत, असे वक्तव्य केले आहे.

ते या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, आपण समाजातील प्राधान्यक्रम ठरवायला हवा. जातीचा त्यासाठी विचार करणे सोडून द्यायला हवे. एखाद्या हिंदू मुलीवर जर कोणी हात टाकला तर त्याचा तो हात राहणार नाही याची काळजी आपण घेऊ, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. त्यांनी शबरीमला मंदिर प्रवेशावरून केलेल्या वक्तव्यावरूनही काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. १० जानेवारी रोजी केलेल्या वक्तव्यात त्यांनी केरळ सरकार लोकांच्या श्रद्धेशी खेळत असून हा हिंदू लोकांवर दिवसाढवळ्या केला जाणार बलात्कार असल्याचे म्हटले होते.

Leave a Comment