यंदाच्या कुंभ मेळ्याचे आकर्षण ठरलेली ‘इंद्रप्रस्थम सिटी’

indraprastham-city1
प्रयागराजमध्ये सध्या सुरु असलेल्या कुंभ मेळ्यासाठी देश-विदेशातील हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे. या महापर्वासाठी उपस्थित असलेल्या भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करवून देण्यात आल्या असून, उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने येथे भाविकांना राहण्यासाठी सहाशे आलिशान ‘टेंट हाऊसेस’ उभारण्यात आली आहेत. या टेंटहाऊसेस मध्ये सर्व सुखसुविधा पुरविण्यात आल्या असून, या टेंटहाऊसमध्ये राहण्याचा अनुभव एखाद्या पंचतारांकित हॉटेलमधील रूममध्ये राहत असल्याप्रमाणेच आहे. या टेंटहाऊसेस साठी मोजावी लागणारी किंमतही बरीच असल्याने येथे येऊन राहणे सर्वसामान्यांना परवडण्यासारखे नाही. या सहाशे टेंटहाऊसेसच्या वसाहतीला ‘इंद्रप्रस्थम सिटी’ असे नाव देण्यात आले आहे.
indraprastham-city4
दिल्ली येथील हितकारी प्रोडक्शन अँड क्रिएशन्स या कंपनीने इंद्रप्रस्थम सिटी उभारली आहे. या ‘टेंट सिटी’ साठी एकूण पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, या तंबूंमध्ये सर्व सुखसोयी पुरविण्यात आल्या आहेत. येथील सर्वात महाग टेंट हाऊसचे भाडे ३५,००० रुपये आहे. या टेंट सिटीमध्ये एकूण सहाशे आलिशान टेंट असून, यातील दोनशे टेंट ‘लक्झरी’ या वर्गात येत असून, यांच्यासाठी सोळा हजार रुपये भाडे आकारले जात आहे. येथे २५० ‘डीलक्स’ टेंट असून, यांचे भाडे बारा हजार रुपये आहे.
indraprastham-city3
अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण असे हे टेंट अतिशय आकर्षक आहेत. या टेंटस् च्या तीन वेगवेगळ्या श्रेणी असून, यांना ‘अत्री’, ‘अंगिरसा’ आणि ‘गौतमा’ अशी नावे देण्यात आली आहे. अत्री कॉटेज (डीलक्स रूम)मध्ये एक डबलबेड, एक टेबल, २ सिंगल सोफा, आणि बाथरूम आहे. तसेच जेवण मिळण्याची सुविधाही येथे देण्यात आली आहे.
indraprastham-city2
या तंबूचे एका दिवसाचे भाडे बारा हजार रुपये आहे. ‘अंगिरसा’ हे तंबू सुपर डीलक्स प्रकारातले असून, यामध्ये पलंग आणि इतर फर्निचर समवेत गरम पाण्यासाठी गीझर, मायक्रोवेव्ह ओव्हन, स्टडी टेबल ही असून याचे भाडे सोळा हजार रुपये प्रति दिवस आहे. ‘गौतमा’ आलिशान स्विस कॉटेज आहे. एखाद्या दोन बेडरूम फ्लॅट इतका मोठा हा तंबू आहे. या टेंटमध्ये दोन बेडरूम्स, एक बैठकीची खोली, आणि एक जेवणघरही आहे. अन्य सर्व सुविधांच्या सोबत येथे एलईडी टीव्हीही देण्यात आला आहे. या टेंटचे एका दिवसाचे भाडे पस्तीस हजार रुपये आहे.

Leave a Comment