चीनमधील ही शाळा शिक्षकांना देते ‘लव्ह लीव’

school
आपल्या दैनंदिन कामाच्या धकाधकीमध्ये आजकाल सर्वच जण, विशेषतः आजची तरुण पिढी इतकी गुंतलेली आहे, की आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी, किंवा आपल्या जोडीदाराला देण्यासाठी त्यांच्याकडे पुरसा वेळच नाही. हीच बाब लक्षात घेऊन चीनमधील एका शाळेने, तिथे काम करणाऱ्या शिक्षकांना ‘लव्ह लीव’ देण्याची कल्पना शोधून काढली आहे. ही सुट्टी खास ‘सिंगल’ लोकांना स्वतःसाठी जोडीदार शोधण्यासाठी असून, जे शिक्षक विवाहित आहेत, त्यांच्यासाठी देखील ‘फॅमिली लीव’ची तरतूद या शाळेने केली आहे.
love1
आजकाल एकमेकांना देण्यासाठी वेळ नसल्यामुळे, परस्परांशी म्हणावा तितका संवाद होत नाही. याच कारणास्तव दाम्पत्यांमध्ये असमाधानाची भावना वाढीला लागलेली पहावयास मिळते. जर ही भावना पराकोटीला पोहोचली, तर वेगळे होण्याच्या निर्णयापर्यंत जाऊन ठेपते. तर दुसरीकडे जोडीदाराला देण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही हे ठाऊक असलेल्या अनेक व्यक्ती आजकाल ‘सिंगल’ राहणे पसंत करत आहेत. या सर्व गोष्टींवर तोडगा म्हणून चीनमधील जेहीयांग प्रांतातील डिंगलान एक्स्पेरिमेंटल मिडल स्कूल या शाळेने ‘लव्ह लीव’चा पर्याय शोधून काढला आहे. या शाळेमध्ये शिक्षकांना देण्यात येणाऱ्या या सुट्ट्या १५ जानेवारी पासून सुरु झाल्या आहेत.
love
शाळेने दिलेल्या या सुट्टीचा आपल्याला चांगला उपयोग झाल्याचे काही ‘सिंगल’ असणाऱ्या शिक्षकांना वाटते. तर कोणत्याही प्रकारची धावपळ टाळून, आपल्या परिवारासाठी आपल्याला वेळ देता आला, परिवारजनांसोबत मनमोकळा संवाद साधण्याची उत्तम संधी मिळाली याबद्दल विवाहित असलेले शिक्षकही समाधानी आहेत.

Leave a Comment