सलमान खानच्या ‘भारत’चा टीझर रिलीज

salman-khan
बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान याच्या आगामी ‘भारत’चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. दमदार डायलॉग आणि धडाकेबाज अॅक्शन सीन 1 मिनिट 26 सेकंद एवढ्या अवधीच्या या टीझरमध्ये दिसून येतात. त्यामुळे याही चित्रपटात सलमानच्या आधीच्या भूमिकांना साजेशी असेच एकंदरीत सीन असतील, यात शंका नाही.

या चित्रपटात सलमान खानच्या व्यक्तिरेखेचे ‘भारत’ असे नाव असून, त्याने आडनाव का लावले नाही, याबाद्दल सलमान काही संवादांमधून टीझरमध्ये समजावून सांगतो. सलमान खानची कुठल्यातरी सर्कसमध्ये बाईकवरुन आगीतून एन्ट्री होते. हा टीझर सलमान खानने ट्वीटर-फेसबुकवरुन शेअर केला आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये टीझरने यूट्यूबवर लाखोंचा टप्पा पार केला आहे.

‘भारत’चे दिग्दर्शक अली अब्बास जफर हे असून, अभिनेत्री कतरिना कैफ, दिशा पटानी आणि सुनील ग्रोव्हर हेही यात दिसणार आहेत. 2019 च्या म्हणजे यंदाच्या ईदला ‘भारत’ रिलीज होणार आहे. याची खूप महिन्यांपासून चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे टीझरवर सलमानच्या चाहत्यांनी अक्षरश: उड्या मारल्या आहेत.

Leave a Comment