भाषेच्या प्रसारासाठी ‘हा’ तरुण करतोय सायकलवरून देशभ्रमंती

bicycle
हैदराबाद – भारतामध्ये अनेक प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. प्रत्येक प्रांताची भाषा ही वेगळी असते. संस्कृतीचा वारसा जपण्यात भाषेचे महत्त्व अन्यनसाधारण आहे. त्यासाठी प्रयत्न ही केले जाते. आपली भाषा जपण्यासाठी डोंबिवलीत राहणारा एक तरुण प्रयत्न करित आहे. पण या तरुणाचा प्रयत्न ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

गंगाधर या तरुणाने भाषेच्या प्रसारासाठी चक्क सायकलवर देशभ्रमंती करत आहे. आत्तापर्यंत गंगाधरने भाषेचा प्रसार करीत १५ राज्याची भ्रमंती केली आहे. प्रत्येकाने आपली मातृभाषा बोलली व जपली पाहिजे हाच संदेश देण्यासाठी गंगाधरने १ जुलै २०१८ रोजी महाराष्ट्रातून आपली सायकलवारी सुरू केली. त्याने आत्तापर्यंत २०७ दिवसात त्याने ११,४०० किलोमीटर अंतर सायकलवर प्रवास करत पार केले आहे. या प्रवासात हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू राज्यातून प्रवास करत त्याची सायकलवारी आता आंध्रप्रदेशात आली आहे.

या प्रवासा दरम्यान गंगाधरने अनेक विद्यार्थ्यांशी संवादला आणि त्यांना भाषेचे महत्त्व पटवून दिले. त्याने अनेक शैक्षणिक संस्थानांही भेटी दिल्या आहे. भाषेच्या जपवणुकीसाठी सरकारलाकृतीकार्यक्रम हाती घेण्यासाठी विनंती करत आहे. तसेच देशतील २ हजार शैक्षणिक संस्थांना गंगाधर भेट देणार आहे. आंध्रप्रदेशनंतर गंगाधर तेलंगणा, ओडिसा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश व छत्तीसगढ राज्यात जाऊन भाषेचा प्रसार करणार आहे.

या सायकलवारीसाठी तब्बल ४ लाखांचा खर्च झाला असून एका कंपनीने ५० हजारांची मदत केल्याचे गंगाधरने सांगितले. ही सायकलवरील १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत पूर्ण होईल असे मत गंगाधरने व्यक्त केली.

Leave a Comment