मॉरीशस पंतप्रधानांनी कुंभमेळ्यात केली पूजा

mauritius
प्रवासी भारतीय दिवसाचे प्रमुख अतिथी म्हणून वाराणसीला आलेले मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी प्रयागराज कुंभमेळ्यात गुरुवारी सामील होऊन पूजा अर्चा केली. प्रविंद सपत्नीक आले असून त्यांनी संगम तटावर पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलतना त्यांनी प्रथम प्रवासी भारतीय दिवसाचे मुख्य पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले. ते म्हणाले आमची अतिशय उत्कृष्ट व्यवस्था ठेवली गेली. प्रयागराज कुंभमेळ्यात येऊन अध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळाला. भारत मॉरीशस नाते अधिक दृढ होईल असा विश्वास वयात करताना त्यांनी गंगा नदीकडून भारत आणि मॉरीशस साठी आशीर्वाद मागितल्याचे सांगितले. त्यांनी यावेळी लेटा हनुमान, अक्षयवट आणि सरस्वती कुंड यांचेही दर्शन घेतले.

Leave a Comment