आता वाघ आणि शार्क करणार आकाशात उड्डाण

tiger
देशोदेशीच्या कोणत्याही विमानतळावर आजकाल विमानांची गर्दी दिसून येते. विमानप्रवाशांची वाढलेली संख्या आणि वाढते पर्यटन त्यासाठी कारणीभूत आहे. असे असले तर विमानतळावर विमानांची गर्दी झाली कि विमान कंपन्यांना त्यांची विमाने ओळखणे बरेचदा अवघड बनते. यावर मार्ग म्हणून ब्राझीलच्या विमान उत्पादक कंपनी अम्ब्रेयरने वेगळीच शक्कल लढविली आहे.

shark
या कंपनीने प्रयोग म्हणून दोन विमानांना वाघ आणि शार्क मासा यांचा लुक दिला आहे. त्यामुळे ती गर्दीतही चटकन ओळखू येत आहेत. अर्थात विमाने बाहेरून वेगळ्या पद्धतीने रंगविण्याची ही कल्पना तशी जुनी आहे. १९९० च्या दशकात ती सुरु झाली. गतवर्षी चीनच्या सिचुयान एअरलाईन्सने त्यांच्या एका एअरबस विमानाला पांडा या प्राण्याचा लुक दिला होता. ९० च्या दशकात वेस्टर्न पॅसिफीक एअरलाईन्सने फॉक्स टेलीच्या थीमवर विमान पेंट केले होते तर अन्य एका कंपनीने फुटबॉल खेळाडूंचे चेहरे रंगविले होते.