पर्यटकांचे आकर्षण असलेले हे आइसलँड मधील ‘ब्ल्यू लगून’

blue-lagoon1
आइसलँड मध्ये असलेले हे ‘ब्ल्यू लगून’ जगातील सर्वात मोठी नैसर्गिक ‘जकुझी’ म्हणता येऊ शकेल. आठशे वर्षांपूर्वी नैसर्गिक रित्या तयार झालेल्या लाव्हा फील्डमध्ये हे ‘ब्ल्यू लगून’ आहे. या लगूनमध्ये सुमारे नऊ मिलियन लिटर, भूगर्भातील उष्णतेमुळे गरम झालेले (geo-thermal) पाणी आहे.
blue-lagoon2
जमिनीखाली ६५०० फुटांच्या खोलीवर या पाण्याचे स्रोत आहेत. या पाण्यामध्ये सिलिका आणि सल्फर मोठ्या प्रमाणावर असून, या पाण्यामध्ये त्यामुळे हलके बुडबुडे सातत्याने येत असतात. हे क्षार या पाण्यामध्ये मुबलक मात्रेमध्ये असल्याने या लगूनमधील पाण्याला खडू प्रमाणे पांढरा रंग आहे.
blue-lagoon
या लगूनमधील पाण्याचे तापमान १०४ अंश फॅरेनहाईट असून, या पाण्यामध्ये डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असतात. या गरम पाण्याच्या तलावामध्ये डुंबण्याव्यतिरिक्त येथे असलेल्या सिलिका बार मध्ये पर्यटक सिलिका फेशियलचा अनुभवही घेऊ शकतात.

Leave a Comment