मनसेच्या ‘ठाकरे’ चित्रपटाला ‘मनसे’ शुभेच्छा, पण….

thakre1
मुंबई : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून 25 जानेवारी रोजी बाळासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘ठाकरे’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण ठाकरे चित्रपट, बाळसाहेबांची जयंती असे निमित्त साधून मनसेने शिवसेनेला टोला लगावला आहे. मनसेतर्फे ‘मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटाला शुभेच्छा,’ असा मजकूर असलेले पोस्टर लावण्यात आले आहे.
thakre
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर हा चित्रपट मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केला आहे. परंतु चित्रपटाचे निर्माते संजय राऊत दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना म्हणावे तसे श्रेय देत नसल्याचे मनसेला वाटत असल्यामुळे संजय राऊत यांचा उल्लेख न करता चित्रपटाला शुभेच्छा देणारे पोस्टर मनसेतर्फे दादरमध्ये लावण्यात आले आहे. ज्यावर ‘मनसे नेते अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या ठाकरे चित्रपटाला मनसे शुभेच्छा, असे लिहिले आहे.

Leave a Comment