भारतीय नागरिकांना येत्या काळात मिळणार ई-पासपोर्ट

passport
नवी दिल्ली : येत्या काळात भारतीय नागरिकांना ई-पासपोर्ट दिले जाणार असून सध्या एका केंद्रीकृत पासपोर्ट प्रणालीद्वारे चिप आधारित ई-पासपोर्ट जारी करण्याचे काम सुरु आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे आयोजित एका समारंभात याबाबतची माहिती दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जागतिक स्तरावर सर्व दूतावासांशी भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा प्रकल्पाद्वारे जोडले जाणार आहेत. पासपोर्ट सेवेशी संबधित एक केंद्रीकृत प्रणाली सर्व भारतीयांच्या सेवेसाठी तयार केली जाणार आहे. त्यामध्ये एक पाऊल पुढे जाऊन चिप आधारित ई-पासपोर्टसाठी काम केले जाणार आहे.

एटीएम कार्डनंतर आता पासपोर्टमध्येही चिप लावली जाणार असल्यामुळे पासपोर्टची सुरक्षा, प्रिंटिंग आणि पेपर क्वालिटीत सुधारणा होईल, असे म्हटले जात आहे. या पासपोर्टची निमिर्ती इंडिया सिक्युरिटी प्रेस नाशिकमध्ये केली जाणार आहे. पासपोर्टमध्ये चिप लावल्यामुळे ई-पासपोर्ट बनवणे सोपे जाणार असल्याची माहिती मोदींनी सांगितले.

Leave a Comment