बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली दीपिका पादूकोण

deepika-padukone
सिनेजगतात आपले नाव बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने उच्चस्थानी नेले आहे. ती आज बॉलिवूडमधील सर्वात मोठी अभिनेत्री आहे. ती आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये बाकी अभिनेत्रींच्या तुलनेत अव्वल स्थानी आहे. सध्यातरी ती सर्वात जास्त मानधन घेणारी एकमेव अभिनेत्री आहे. चित्रपटातील सह-कलाकारांपेक्षाही तिचे मानधन जास्त आहे.

दीपिका उल्लेखनीय कामगिरी त्याचबरोबर दिग्दर्शकांचा तिच्यावर असलेला विश्वास आणि चाहत्यांचे प्रेमामुळे यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. तिने बॉलिवूडमधील प्रसिद्ध तीन खानांनासुद्धा मागे टाकले आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने सांगितले, की माझ्यासाठी मागील वर्ष वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या फार खास होते. माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की मी अभिनय क्षेत्रात अव्वल स्थानी आहे. आपले नाव यशाच्या शिखरावर आहे, यापेक्षा अधिक आनंद देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही. मानधन स्वीकारण्याच्या यादीत भारतीय क्रिकेटचे कर्णधार विराट कोहली नंतर दीपिकाचा दुसरा नंबर लागतो.

Leave a Comment