प्राथमिक मदरसे बंद करा – वसीम रिझवींची पंतप्रधानांकडे मागणी

wasim-rizvi
अयोध्येत श्रीराम मंदिराच्या बांधकामाला पाठिंबा देऊन चर्चेत आलेले उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी आणखी एक धमाका केला आहे. देशातील प्राथमिक मदरसे बंद करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रिझवी यांनी मंगळवारी हे पत्र पंतप्रधानांच्या नावे लिहिले असून. प्राथमिक मदरसे बंद झाले नाहीत तर 15 वर्षांनंतर मोठ्या संख्येने मुसलमान इस्लामिक स्टेटमध्ये (इसिस) दाखल होतील, असे त्यांनी म्हटले आहे. इसिस ही एक भयानक दहशतवादी संघटना असून ती कोणतीही योजना यशस्वी करण्यासाठी बालकांना लक्ष्य करते. ही संघटना हळूहळू मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या भागांमध्ये आपली पकड वाढवत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मदरशात इस्लामी शिक्षण घेणाऱ्या बालकांना आर्थिक मदत पोचवून इस्लामी तालीमच्या नावावर त्यांना अन्य धर्मांपासून वेगळे करण्यात येत आहे. विशेषतः ग्रामीण भागांमधील प्राथमिक मदरसे वर्गणीच्या आमिषाने मुलांचे भविष्य बरबाद करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

माध्यमिक शाळा उत्तीर्ण झाल्यावर संबंधित मुलाला स्वतःला धर्माचे शिक्षण हवे असेल तर त्याने मदरशात प्रवेश घ्यावा, अशी व्यवस्था करायला हवी, अशी सूचनाही रिझवी यांनी केली आहे.

Leave a Comment