शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर

shivsena
मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकारने हा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी घेतला आहे.

हा निधी सुरूवातीला एमएमआरडीए खर्च करणार आहे. राज्य सरकार त्यानंतर हा निधी एमएमआरडीएला वर्ग करेल. गेल्या काही दिवसांपासून स्मारकासाठी असलेल्या जागेचा तिढा कायम होता. अखेर मुंबईच्या महापौर बंगल्याचा पर्याय निवडण्यात आला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर स्मारकाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, जागेची निवड आणि विविध परवानग्यांची पूर्तता यामुळे काम पाच ते सहा वर्षे रखडले होते. दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याचा पर्याय त्यानंतर समोर आला. स्मारकासाठी महापौर बंगला रिकामा करण्यात आला. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी भायखळा येथील राणीबागेतल्या बंगल्यात गृहप्रवेश केला.

Leave a Comment