अजय देवगण आणि काजोलची कन्या करणार का बॉलीवूडमध्ये एन्ट्री?

Ajay-Devgn-daughter
आजच्या काळामध्ये बॉलीवूडमध्ये अनेक ‘स्टार किड्स’ पाहावयास मिळत आहेत. या स्टारकिड्सचे मातापिता प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक किंवा सिनेसृष्टीशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे संबंधित आहेत. अलीकडच्या काळामध्ये जान्हवी कपूर आणि सारा आली खान या स्टार किड्सनी बॉलीवूडमध्ये यशस्वी पदार्पण केले आहे. आता अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल या दाम्पत्याची कन्या न्यासा लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची तयारी करीत असल्याचे वृत्त आहे.

अजय देवगणने मात्र या वृत्ताला दुजोरा न देता, ही केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे. तसेच आपल्या मुलीला चित्रसृष्टीमध्ये येण्यात अजिबात रस नसल्याचे ही अजय म्हणतो. न्यासा सध्या शिक्षणाच्या निमिताने परदेशामध्ये असून, सध्या तरी तिला चित्रपट करण्यात रस नाही. मात्र काही काळानंतर तिचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता असल्याचेही अजय एक वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला. सध्या अजय त्याच्या आगामी ‘टोटल धमाल’ चित्रपटाच्या प्रमोशन्समध्ये व्यस्त असून, या चित्रपटाचे ट्रेलर नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

या चित्रपटाच्या पोस्टर्सना चाहत्यांची पसंती मिळाली असून, ‘धमाल’, ‘डबल धमाल’ या चित्रपटमालिकेतील हा तिसरा चित्रपट चित्रपट आहे. हा चित्रपट २२ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment