अंशुल अंबानी मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कामावर रुजू

anshul
उद्योजक अनिल अंबानी यांचा धाकटा मुलगा अंशुल याने रिलायंस इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम सुरु केले आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी कामाची सुरवात केली असून त्यांनी मॅनेजमेंटविषयात उच्चशिक्षण घेतले आहे. २३ वर्षीय अंशुल यांनी भाऊ अनमोल प्रमाणे प्रथम घरच्या उद्योगात प्रशिक्षणार्थी म्हणून कामाला सुरवात केली आहे.

रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर रिलायंस ग्रुपच्या इंजिनिअरींग, कन्स्ट्रक्शन, पॉवर जनरेशन, वितरण, मुंबई मेट्रो, डिफेन्स बिझिनेस, रोड व एअरपोर्ट परीयोजनांची होल्डिंग कंपनी आहे. अंशुल यांचे भाऊ अनमोल यांनी २०१४ मध्ये रिलायंस म्युच्युअल फंड मधून ट्रेनी म्हणून कामाची सुरवात केली होती आणि २०१६ मध्ये त्यांनी कॅपिटल बोर्ड जॉईन केले होते. ते सध्या कंपनीच्या वित्तीय सेवा विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Leave a Comment