‘पद्मावत’च्या चित्रीकरणादरम्यान रणवीर-शाहिदमध्ये वाद?

padmavat
संजय लीला भंसाली दिग्दर्शित चित्रपट ‘पद्मावत’ हा सुरुवातीपासूनच अनेक वादांच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यातून या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान घडलेल्या अनेक घटनांच्या बद्दलही अफवांचे मोहोळ उठले होते. दीपिकाने या चित्रपटातून अभिनेता विकी कौशल याला हटविण्यात यश मिळविल्याची अफवा चांगलीच वादग्रस्त ठरली. दीपिकाला केवळ उत्कृष्ट दर्जाच्या अभिनेत्यांच्या सोबत भूमिका करायची असल्याने तिच्या सल्ल्यावरून विकी कौशलला चित्रपटामधून काढून टाकले असे म्हटले जात होते. पण कालांतराने ही केवळ अफवा असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे वादळ शांत झाले.
padmavat1
त्याचबरोबर या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान अभिनेते रणवीर सिंह आणि शाहिद कपूर यांच्यातही वाद असल्याचे म्हटले गेले. इतकेच नव्हे, तर एकमेकांच्या समोर येणेही या अभिनेत्यांना पसंत नसून, अखेरीस दीपिकाच्या मध्यस्थीने सर्व प्रकरण ठीक झाल्याचे समजते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एक वर्ष उलटून गेल्यानंतर रणवीर सिंहने याबाबतीत आपले मौन सोडले असून, त्याच्यामध्ये आणि शाहिदमध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे वाद, मतभेद झाले नसल्याचे रणवीरचे म्हणणे आहे. किंबहुना या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी सर्वांनी अतिशय आनंदाने एकमेकांच्या सहवासामध्ये वेळ घालविल्याचे रणवीर म्हणतो.
padmavat2
पद्मावत प्रदर्शित झाल्यानंतर शाहिदने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये, पद्मावतच्या सेट्सवर ‘आपण एखादा आगंतुक असल्याप्रमाणे वाटत आहे’ असे म्हटल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. रणवीर आणि दीपिका यांनी संजय लीला भंसाली यांच्यासोबत आधी ही काम केले असल्याने सर्व वातावरण, काम करण्याची पद्धत यांच्या परिचयाची असून, शाहिदला हे सर्व नवीन असल्याने त्याला अवघडल्यासारखे होत असल्याचे म्हटले जात होते. मात्र त्याचा परिणाम त्या अभिनेत्यांच्या परस्परसंबंधांवर झाला नसून, यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद झाले ही केवळ अफवा असल्याचे रणवीर म्हणाला.

Leave a Comment