व्हिडीओ – दिलेले टार्गेट नाही केले पुर्ण म्हणून मिळाली अशी शिक्षा

viral
नवी दिल्ली – कोणत्याही खासगी कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना एखादे टार्गेट दिले जाते. पण हेच टार्गेट एखाद्या कर्मचा-याने पुर्ण केले नाहीतर त्याच्या बॉसने त्याला काही शारीरिक शिक्षा दिल्याचे वृत्त आतापर्यंत तरी तुम्ही ऐकले नसेल. पण सध्या सोशल मीडियावर चीनमधील एका कंपनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे शिक्षा दिली जाते, याचे छातीत धडकी भरवणारे चित्रच या व्हिडिओमुळे पुढे आले आहे.

टार्गेट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चीनमधील एका कंपनीने रस्त्यावर रांगायला लावण्याची शिक्षा दिली. असाच एक प्रकार काही दिवसांपूर्वीच पुढे आला होता. त्यामध्ये टार्गेट पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्यांना लाफा मारण्यात येत होते. अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे कंपनीतील टार्गेट, ते पूर्ण करण्याचा दबाव किती भयानक झाला आहे, याचा प्रत्यय येतो.

चीनमधील एका एका संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार हा व्हिडिओ चीनमधील शेनडोंगचा आहे. एक माणूस व्हिडिओमध्ये हातात झेंडा घेऊन पुढे चालत असल्याचे दिसते. काही लोक त्याच्या मागे रांगत रांगत जात आहेत. जेव्हा हा सगळा प्रकार पाहून पोलिसांनी आक्षेप घेतला. त्यावेळी कर्मचाऱ्यांची शिक्षा थांबविण्यात आली. काही महिन्यांसाठी संबंधित कंपनी बंद करण्यात आली होती, अशीही माहिती तपासात पुढे आली आहे. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांना रांगेत थांबवण्यात आले असून, एक महिला त्यांना थप्पड मारत असल्याचे दिसले होते.

सोशल मीडियावर कर्मचाऱ्यांना रस्त्यावर रांगायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्याविरोधात संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारे स्वतःच्या कर्मचाऱ्यांचा अपमान करणाऱ्या कंपनीला टाळे ठोकले पाहिजे. केवळ नोकरीसाठी कर्मचारी आत्मसन्मानाशी कसे काय खेळू शकतात, असा प्रश्न लोकांकडून विचारण्यात आला आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment