तेज बहादूर यादव यांच्या मुलाने केली आत्महत्या

tejbhadur-yadav
नवी दिल्ली – सोशल मीडियावर लष्कराकडून सैनिकांना मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत व्हिडिओ शेअर करणारे सीमा सुरक्षा दलाचे जवान तेजबहादूर यादव यांच्या मुलाने आत्महत्या केली आहे. त्यांच्या मुलाचे नाव रोहित (वय २२), असे असून त्याने राहत्या घरात पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

सीमा सुरक्षा दलाचे जवान तेज बहादूर यादव यांनी काही महिन्यांपुर्वी जवानांना मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून खळबळ उडवून दिली होती. त्यांच्यावर याची दखल घेऊन निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली होती. ते सध्या हरियाणातील रेवाडी शहरात राहतात. दिल्ली विद्यापीठात त्यांचा मुलगा रोहित हा शिक्षण घेतो. तो काही दिवसांपुर्वी घरी आला होता. काल दुपारी स्वतःच्या खोलीत कोंडून घेत त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यावेळी घरात कोणीही नसल्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Leave a Comment