सिद्धार्थ जाधवच्या ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’चा ट्रेलर रिलीज

movie
‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यास सज्ज झाला असून या चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

बाब्या आणि समीर म्हणजेच सिद्धार्थ जाधव अन् सौरभ गोखले या दोघांभोवती चित्रपटाची कथा फिरणार आहे. अगदी हलके फुलके विनोद चित्रपटात प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. येत्या १ फेब्रुवारीला प्रदीप मेस्त्री यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटातून प्रेक्षकांना लग्न आणि प्रेमाच्या बेडीत अडकणाऱ्या प्रेमवीरांची होणारी गफलत पाहायला मिळणार आहे. सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल अशा कलाकारांची तगडी स्टारकास्ट या चित्रपटात असणार आहे. याशिवाय दिग्दर्शक महेश मांजरेकर हे देखील या चित्रपटात कॉमेडी करताना दिसणार आहेत.

Leave a Comment