कसा झाला भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू

krishna1
श्रीकृष्णाशी संबंधित अनेक रोचक गोष्टी आहेत. श्रीकृष्णाला हिंदू धर्मातील संपूर्ण अवतार मानले जाते. त्यांना 64 कलाचा स्वामी समजले जाते. कृष्णाची जन्माष्टमी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला होता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत श्रीकृष्णाचा मृत्यू नेमका कसा झाला.
krishna
असे म्हटले जाते की, श्रीकृष्णाचा जन्म 3112 इ.स. पूर्व मध्ये झाला. श्रीकृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला असला तरी त्यांचे बालपण गोकुळ, वृंदावन, नंदगाव, बरसाणा आणि द्वारका या ठिकाणी गेले. महाभारताच्या युद्धानंतर 36 वर्ष भगवान श्रीकृष्ण यांनी द्वारकेवर राज्य केले . त्यानंतर त्याने आपल्या देहाचा त्याग केला म्हणजेच त्यांचा मृत्यू झाला. त्या वेळी त्यांचे वय 125 होते.
krishna2
महाभारत युद्ध होऊन 35 वर्षे नंतर एक दिवस श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न अर्थात सांब याने आपल्या काही मित्रासोबत एका ऋषिंची गंमत केली. तो स्त्री वेष धारण करुन ऋषि विश्वामित्र, दुर्वासा, वशिष्ठ व नारद यांना भेटायला गेला. त्यावेळी ते सगळे श्रीकृष्णाबरोबर एका औपचारिक बैठकीत सामिल होण्यासाठी द्वारकेस आले होते. सांबने आपल्या वस्त्रात एक लोखंडी मुसळ लपवले आणि तो गर्भवती स्त्री वेषात त्यांच्यातल्या एका ऋषी समोर उभा राहिला आणि विचारले ” मला मुलगा होईल की मुलगी?” त्या महात्म्याने या अक्षम्य चेष्टेस ओळखली. जराही विचलित न होता ते ऋषीराज म्हणाले. या “गर्भातून जो जन्म घेईल तो यादव वंशाच्या सर्वनाशाचे कारण बनेल.” ऋषिंनी क्रोधित होऊन सांबास शाप दिला कि , तो एका लोखंडी बाणास जन्म देशील आणि ज्यामुळे यादवकुळ आणि साम्राज्याचा विनाश होईल.
krishna5
एके दिवशी श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करत होते. यावेळी पारधी हरणाच्या शिकारासाठी आला होता. त्याला श्रीकृष्णाच्या पायाचा तळवा म्हणजे हरणाचे शीर असे वाटले. त्याने बाण चालवला. तो तळव्यात खोलवर गेला. पारध्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याने क्षमायाचना केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, की तू विधीनियत काम केले आहे. हे तुझ्याच हातून होणार होते. अशा प्रकारे श्रीकृष्णाचा अंत झाला.

Leave a Comment