दीपिका आहे शिस्तप्रिय पत्नी, म्हणतो रणवीर

deepika-ranveer
बॉलीवूडचे सुपरस्टार्स रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन जेव्हा गतवर्षी नोव्हेंबर मध्ये विवाहबद्ध झाले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आनंदाने आभाळ ठेंगणे झाले. रणवीर आणि दीपिका गेली अनेक वर्षे एकत्र असून, त्यांचा विवाह कधी पार पडतो याबद्दल त्यांच्या चाहत्यांना विलक्षण उत्सुकता लागून राहिली होती. पण हा विवाहसोहोळा अखेर इटलीतील लेक कोमो येथे पार पडला आणि या विवाहसोहळ्याची व त्यानंतरच्या स्वागतसमारंभांची छायाचित्रे पाहून रणवीर-दीपिकाच्या चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
deepika-ranveer1
आता रणवीर आणि दीपिकाच्या दाम्पत्यजीवनाला सुरुवात झाली असून, या नवपरिणीत दाम्पत्याची अनेक छायाचित्रे सोशल मिडीयावर वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात. तसेच विवाहानंतर एकमेकांच्या सान्निध्यात आपण आनंदी आणि समाधानी असल्याचे ही रणवीर आणि दीपिका म्हणतात. अलीकडच्या काळामध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रणवीरने, दीपिका अतिशय शिस्तप्रिय असून, तिने रणवीरसाठी देखील काही नियम घालून दिले असल्याचे सांगितले.
deepika-ranveer2
दीपिकाने रणवीरसाठी काही नियम घालून दिले असून, यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी समाविष्ट असल्याचे रणवीर म्हणाला. सर्वप्रथम, रात्री उशीरापर्यंत घराबाहेर राहण्याची परवानगी आता रणवीरला नाही. अर्थात रणवीर एखाद्या कामानिमित्त किंवा चित्रीकरणाच्या निमित्ताने बाहेर असेल, तर हे बंधन लागू नाही. तसेच घराबाहेर पडताना उपाशीपोटी बाहेर न पडता काही तरी खाऊन मगच घराबाहेर पडायचे असा आणखी एक नियम दीपिकाने रणवीरसाठी घालून दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त दीपिकाचे आलेले फोनकॉल नेहमी स्वीकारणे हा आणखी एक नियम दीपिकाने घालून दिला असल्याचे रणवीर म्हणतो.

Leave a Comment