काँग्रेस आमदारांचे अपहरण केल्यामुळेच अमित शहांना स्वाईन फ्ल्यूची लागण

congress
नवी दिल्ली – भाजपध्यक्ष अमित शहा यांच्याबाबत काँग्रेस नेते हरिप्रसाद यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शहा यांना स्वाईन फ्ल्यू झाला असून ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

३ वेळा भाजपच्या चाणक्यने प्रयत्न करूनही ते यशस्वी झाले नाहीत. दिवसाढवळ्या ते स्वप्न पाहत आहेत. काँग्रेसच्या ४ आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांचे शहा यांनी अपहरण केले असल्यामुळेच शहा यांना स्वाईन फ्ल्यू झाला असल्याचे हरिप्रसाद यांनी म्हटले आहे. तसेच हरिप्रसाद यांनी राफेलवरुनही भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने राफेलमध्ये घोटाळा करुन तो पैसा कर्नाटकातील सरकारला संकटात आणण्यासाठी वापरला असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, शहांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे. त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळेल, असेही सांगण्यात आले आहे.

Leave a Comment