स्वाईन फीव्हरच्या भीतीने चीनमध्ये 10 लाख डुकरांची कत्तल !

Swine-Virus
आफ्रिकन स्वाईन फीव्हरवर नियंत्रण मिळविण्यासाठी चीनने सुमारे दहा लाख डुकरांची कत्तल केली आहे. चीनच्या कृषी व ग्रामीण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. चीनने 14 जानेवारीपर्यंत 9 लाख 16 हजार डुकरांना मारले आहे, असे मंत्रालयाचे प्रवक्ते गुआंग डीफू यांनी सांगितले.

“आता येणारी प्रकरणे ही क्वचित उद्भवणारी असून ती महामारीच्या प्रमाणात नाहीत,” असे ते म्हणाले.

प्रांतीय पातळीवरील क्षेत्रांनी 24 ऑगस्टपासून प्रकरणांची नोंद केली गेली आहे. त्यानुसार 21 क्षेत्रांमधील 77 संक्रमित भागांमध्ये बंदी उठविण्यात आली आहे, असे ग्वांग म्हणाले.
आफ्रिकन स्वाईन फीव्हरचा संसर्ग फक्त डुकरांना होतो, असे मानले जाते आणि आतापर्यंत मानव किंवा इतर प्रजातींना याचा संसर्ग झालेला नाही.

चीनने ईशान्येतील लिओनिंग या प्रांतात ऑगस्ट 2018 मध्ये या रोगाच्या पहिल्या प्रकरणाची नोंद केली होती. तेव्हापासून चीनमधील अनेक शहरांत डुकरांमध्ये हा विषाणू असल्याचा संशय आहे. हा रोग पसरण्यापासून रोखण्यासाठी संसर्ग झालेले पशुधन व डुकरे नष्ट करणे हा एकमेव मार्ग आहे.

चीनमध्ये डुकराच्या मांसाचे उत्पादन जगात सर्वाधिक होते. जगातील अर्धी डुकरे ही चीनमध्ये असून तेथे दरडोई डुकराचे मांस खाण्याचे प्रमाण जास्त आहे.

Leave a Comment