
इंडोनेशियामध्ये एका घटनेमुळे सर्वांनाचा धक्का बसला आहे. सुलावेसी बेटामधील एका महिलेला मगरीने मारुन टाकले. डीसी टुओ असे या महिलेचे नाव आहे. 14 फुट मगरीने डीसीला गुरुवारी मारले. डीसीचा मृतदेह खराब परिस्थितीत आढळला. स्थानिक संरक्षण एजन्सीचे हेंड्रिक रनडेनगन म्हणाले की, गुरुवारी सकाळी 44 वर्षीय महिलेचा मृतदेह खराब अवस्थेत आढळला. डीसी टुओने मगरीला घरात पाळले होते.
हौशीने पाळली मगर, ती उठली तिच्याच जीवावर
ते म्हणाले की, ‘घटनाक्रम बघता ही महिला मगरीची शिकार बनली आहे. डीसीचा एक हात आणि पोट या मगरीने खाल्ले होते. पोलीस चौकशी करीत आहे. मगरीचे नाव मैरी आहे. हेंड्रिक रनडेनगन सांगितले की, शरीराचे अनेक भाग गायब आहेत. कदाचित मगरीने डीसी टुओला मरुन मृत शरीराचे अवयव खाल्ले असतील.
मागील सोमवारीच मगरीला बेशुद्ध केले आणि ऑपरेशन करुन शरीराचे भाग काढून घेतले. हेंड्रिक रनडेनगन म्हणाले की, डीसी टुओ यांनी अवैधरित्या घरामध्ये मगरीला ठेवले होते. या मगरीला इंडोनेशियाच्या एका बेटातून आणले गेले होते. जेथे अनेक धोकादायक मगरी आढळतात. या मगरी लोकांवर हल्ला करुन त्यांना खाऊन टाकतात.
