6 वर्षाच्या चिमुकल्याने ॲलेक्साला बनवले आपला गणिती शिक्षक

boy
आपण ॲलेक्साचा वापर अलार्म किंवा संगीत ऐकण्यासाठी करतो. एमेवर्चुअल असिस्टेंट ‘ॲलेक्सा’ सर्व कार्य करू शकतो, परंतु अमेरिकेत न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या सहा वर्षांच्या मुलाने ॲलेक्साचा असा उपयोग केला आहे की याची आपण कल्पना देखील करु शकत नाही. या मुलाने ॲलेक्साचा वापर गृहपाठ करण्यासाठी केला आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या मते, या मुलाची आई म्हणते की, मुलाचा गणित हा आवडीचा विषय आहे, परंतु गृहपाठ करताना मुले आळस करतात. त्यामुळे गृहपाठ लवकर करण्यासाठी मुलाने ॲलेक्साचा वापर केला. त्याने ॲलेक्साला गणिताचे प्रश्न विचारले आणि गृहपाठ पूर्ण केला. या मुलाचे नाव जेरियल आणि आईचे नाव यरलीन क्वेवा आहे. यरलीन क्वेवा यांनी ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर केली आहे.


सोशल मीडियावर हा व्हिडिओ वायरल झाला आहे. हा व्हिडिओ ट्विटर यूजर्सना मजेशीर वाटला. काही मुलांनी या चतुरपणाची प्रशंसा केली. तर काहींनी हे चुकीच असल्याचे म्हटले आहे. 11 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सहा वर्षाचा जेरियल गृहपाठ करताना दिसत आहे आणि तो ॲलेक्साला विचारतो पाचमधून तीन गेल्यावर किती राहतील. ॲलेक्साने त्याला योग्य उत्तर दिले. त्यानंतर त्याने ॲलेक्साला त्याच्या मदतीसाठी धन्यवाद देखील म्हटले.

Leave a Comment