अस्वल सैनिकाच्या सन्मानार्थ बनतोय चित्रपट

vojtek
विजटेक या नावाच्या एका अस्वलाने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिक म्हणून कामगिरी बजावली होती याची माहिती फार थोड्या लोकांना आहे. या सिरीयन अस्वलाला कार्पोरेलचा दर्जा दिला गेला होता आणि त्याचे पे बुक तयार केले गेले होते. त्याला राशन दिले जात असे आणि त्याला रँकही दिली गेली होती. पोलंडच्या सैनिकांना रसद पोहोचविण्यात या अस्वलाने मोठी मदत केली होती. त्याच्या स्मरणार्थ आता पोलंड आणि ब्रिटीश फिल्ममेकर एक चित्रपट बनवीत असून तो २०२० मध्ये व्हिक्टरी इन युरोप डेच्या ७५ व्या वर्धापनदिनी रिलीज केला जाणार आहे.

vojtek1
याच युद्धात सहभागी असलेले ९३ वर्षीय वोज्सीएक यांनी विजटेकच्या आठवणी सांगितल्या आहेत. ते म्हणाले आम्ही काम करत असलो कि विजटेक आपणहून आम्हाला मदत करायचा. तो अनाथ होता. क्रेट उचलुन ट्रक पर्यंत नेण्यात तो मदत करत असे. त्याला २२ व्या आर्टीलरी सप्लाय कंपनीत तैनात केले गेले होते. त्याला बिअर सिगारेट मनापासून आवडायची. कधीतरी तो सिगरेट खाऊन टाकायचा.

रात्री तो त्याच्या हँडलर सह झोपत असे पण त्याअगोदर साथीदारांबरोबर कुस्ती खेळत असे. आम्ही हरलो कि तो माफी मागण्यासाठी चेहरा चाटायचा. त्याचे काही जुने फोटो उपलब्ध आहेत. तो ६ फुट उंच आणि २२० किलो वजनाचा होता. तो सोबती सैनिकांच्या गळ्यात पडायचा, दंगा करायचा. पोलंड सैनिकांना तो इराण मध्ये सापडला होता. त्यानंतर त्याने इराक, सिरीया, पॅलेस्टीन, इजिप्त, इटली, स्कॉटलंड देशात प्रवास केला होता. युद्ध संपल्यावर त्याला पोलंड मधील झु मध्ये ठेवले गेले होते तेथे तो वयाच्या २१ व्या वर्षी १९६३ मध्ये मरण पावला.

Leave a Comment