बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार जानकर

mahadev-jankar
नगर- रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मी दिल्लीत काम करण्यास इच्छुक असून, आपण बारामती लोकसभा मतदार संघातूनच निवडणुक लढवणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोर लोकसभेसाठी राष्ट्रीय समाज पक्षाला पाच जागा हव्या आहेत. राष्ट्रीय लोकशाहीकडे पाच जागांसाठी आग्रही असल्याचेही जानकर यांनी स्पष्ट केले.

जानकर म्हणाले की, आपला पक्ष हा नगर लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतच असल्याची ग्वाही देताना रालोआकडे लोकसभेसाठी पाच जागांचा आग्रह धरणार असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी ही माहिती नगरमध्ये माध्यमांशी बोलताना दिली.

पुढे ते म्हणाले की, बारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ असून मी निवडणूक बारामतीसह माढा, अहमदनगर दक्षिण, परभणी, हिंगोली मतदारसंघातून लढवू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. केंद्रात आणि राज्यात येणारे सरकार भाजपचे असणार आहे आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा त्यातील एक घटक पक्ष राहिल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment