टेनिसमधून इंग्लंडच्या अॅन्डी मरेची निवृत्ती

andy-murray
मेलबर्न – टेनिसमधून इंग्लडचा आघाडीचा टेनिसपटू अॅन्डी मरेने निवृत्ती घेतली आहे. इंग्लडला त्याने पहिल्यांदा विम्बल्डन स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले होते. मरेने ऑस्ट्रेलियन ओपन ही आपली अखेरची स्पर्धा असल्याचे जाहीर केले होते. त्याला विम्बल्डन खेळून निवृत्ती घ्यायची होती. पण, त्याने ऑस्ट्रेलियन ओपनमधूनच कमरेच्या दुखण्यामुळे निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.


विम्बल्डनचे विजेतेपद मिळवण्याऱ्या अॅन्डी मरेला कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात पराभव झाला. स्पेनच्या रॉबर्टो अग्यूटने त्याला रोमांचक सामन्यात ६-४, ६-४, ६-७, ६-७, ६-२ असे पराभूत केले. पहिले २ सेट जिंकून रॉबर्टो हा सामना सहज जिंकेल, असे वाटत असतानाच मरेने जोरदार पुनरागमन करताना पुढचे २ सेट जिंकले. पण त्याला शेवटच्या सेटमध्ये ६-२ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे पहिल्याच फेरीतून त्याला स्पर्धेबाहेर जावे लागले आहे.

कमरेच्या दुखण्याने अॅन्डी मरेला हा हैराण होता. त्याने गेल्यावर्षीही कमरेच्या दुखण्यामुळेच ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार घेतल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. परंतु, शस्त्रक्रिया करुनही त्याला हवी तशी फिटनेस मिळवता न आल्यामुळे त्याने निवृत्ती घेतली.

Leave a Comment