कार्तिक आर्यनची ‘पती पत्नी और वो’च्या रिमेकमध्ये वर्णी

kartik-aryan
आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये ‘सोनु की टिटू की स्विटी’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या कार्तिकची सध्या ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळख आहे. आता संजीव कुमार यांच्या १९७८ मध्ये आलेल्या ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या रिमेक तयार करण्यात येणार आहे. कार्तिक आर्यन यात झळकणार असल्याची चर्चा आहे.

याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाचा रिमेक बनवण्याचा निर्णय दिग्दर्शक जुनो चोप्रा यांनी घेतला आहे. या चित्रपटाच्या रिमेकवर अभय चोप्रानेही शिक्कामोर्तब केला आहे. बी. आर. चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटाचा रिमेक तयार करणे म्हणजे आमच्यासाठी मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन संजीव कुमारांची भूमिका साकारणार आहे.

कार्तिकने एका माध्यमाशी बोलताना म्हटले कि, चित्रपटाची स्क्रिप्ट मला खुप आवडली. चित्रपटाच्या कथेत फारसा बदल होणार नाही. पण कथा आजच्या पीढिला आवडेल अशी यासाठी लिहिण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. आता ‘पती पत्नी और’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये कार्तिक संजीव कपूर यांची भूमिका कशाप्रकारे साकारेल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment