केट मिडलटन पुन्हा एकदा गोड बातमी देण्याच्या तयारीत?

kate-midleton
ब्रिटीश राजघराण्यामध्ये सध्या आनंदाचे वातावरण असून, प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कलच्या होणाऱ्या अपत्याची वाट सर्वच जण आवर्जून पहात आहेत. पण त्याचबरोबर शाही घराण्यामध्ये आणखी एका छोट्या पाहुण्याची चाहूल लागली असल्याचेही वृत्त येत आहे. प्रिन्स विलियमची पत्नी केट मिडलटन ही गर्भवती असल्याचे वृत्त येत असून, हे या दांपत्याचे चौथे अपत्य असणार आहे. विलियम आणि केटला जॉर्ज, शार्लोट आणि लुईस ही तीन अपत्ये आहेत. केटने नुकताच आपला ३७ वाढदिवस साजरा केला असून, या निमित्ताने परिवारासमवेत घेतलेली छायाचित्रेही प्रसिद्ध केली गेली आहेत.
kate-midleton1
मात्र केट खरोखरच गर्भवती आहे किंवा नाही याबाबतीतल्या वृत्ताला कोणत्याही प्रकारचा दुजोरा शाही परिवाराच्या वतीने देण्यात आलेला नाही. किंबहुना केट गर्भवती आहे किंवा नाही यावर सामान्य नागरीकांमधेच उलट सुलट चर्चा सुरु असून, हे बातमी खरी आहे किंवा नाही यावर चक्क बेटिंग सुरु असल्याचे समजते. शाही परिवारातील सर्वच सदस्य आणि विशेषकरून आताच्या पिढीतील सदस्य केवळ ब्रिटनमधेच नाही, तर जगभरामध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या घडामोडींविषयी जनतेला उत्सुकता असणे साहजिकच आहे.
kate-midleton2
म्हणूनच केट मिडलटन गर्भवती आहे किंवा नाही, आणि खरेच गर्भवती असल्यास या नव्या पाहुण्याचे आगमन कधी होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. राणी एलिझाबेथनंतर प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे राजे बनणार असून, त्यांच्यानंतर प्रिन्स विलियम राजे होणार आहेत, आणि त्यांची पत्नी केट ब्रिटनची राणी होणार आहे. भविष्यकाळातील राज्यकर्ते म्हणून त्यांच्या विषयी आणि त्यांच्या अपत्यांच्या विषयी ब्रिटीश जनतेच्या मनामध्ये अतिशय प्रेम आणि आपुलकी पहावयास मिळत असते.

Leave a Comment