बॉलिवूडकरांनी विमानतच दिल्या ‘जय हिंद’च्या घोषणा!

vicky-kaushal
आज अभिनेता विकी कौशलचा ‘उरी’ चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा सर्जिकल स्ट्राईकवर आधारित असलेल्या या चित्रपटाला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळत आहे. विकी कौशलच्या अभिनयाला समीक्षकांनीही दाद दिली आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्वांना विकी कौशलसोबत ‘जय हिंद’च्या घोषणाही दिल्या. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


या व्हिडिओत विकी कौशल सोबत आलिया भट्ट, रणवीर सिंग, रणबीर कपूर, वरूण धवन, आयुष्मान खुराना, भूमी पेडणेकर, सिद्धार्थ मल्होत्रा, करण जोहर, रोहित शेट्टी, एकता कपूर यांनी एकत्र येऊन घोषणा देताना दिसत आहेत. सर्जिकल स्ट्राईकचा थरार ‘उरी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. २०१६ साली उरीवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले होते. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.