तमिळनाडूतील जिल्हाधिकाऱ्यांचा आदर्श – मुलीला दिला अंगणवाडीत प्रवेश

collector
समाजातील उच्चभ्रू वर्गाच्या दृष्टीने प्ले स्कूल हा परवलीचा शब्द ठरला आहे. मात्र तमिळनाडूतील एका महिला जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या मुलीला अंगणवाडीत प्रवेश देऊन एक आदर्श उभा केला आहे.

शिल्पा प्रभाकर सतीश असे या अधिकाऱ्याचे नाव असून त्या 2009 सालच्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या तिरुनेलवेलीच्या जिल्हाधिकारी आहेत. जिल्ह्यातील सर्वोच्च पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. अंगणवाडी या बालकांच्या एकात्मिक विकासाची जागा आहे, असे त्या म्हणतात.

मुलीला अंगणवाडीत घालण्याचा विचार तुम्हाला कसा सुचला, असे विचारला असता त्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले, की “आम्ही (सरकारने) अंगणवाडीला प्रोत्साहन द्यायला हवे.”

“आमच्या अंगणवाड्यांमध्ये सर्व सुविधा आहेत. हे (केंद्र) माझ्या घराच्या अगदी जवळ आहे आणि ती (मुलगी) लोकांना भेटते आणि आसपास खेळते,” असे त्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

“आमच्याकडे तिरुनेलवेलीत हजारो अंगणवाडी आहेत आणि त्या प्रत्येकात चांगले शिक्षक आहेत. ते मुलांचे संगोपन करण्यासाठी सुसज्ज आहेत आणि आमच्याकडे चांगल्या पायाभूत सुविधा आणि खेळाची सामग्री आहे. त्यांचा दर्जा खासगी शाळांसारखाच आहे,” असे त्या म्हणाल्या.

Leave a Comment