लवकरच अभिनेत्री कंगना राणावतचा बहुचर्चित ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटातील विजयी भव हे गाणे रिलीज करण्यात आले असून हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत हा चित्रपट रिलीज होणार आहे.
शंकर महादेवन यांनी ‘विजयी भव’ या गाण्याला आवाज दिला असून गाण्याचे बोल प्रसुन जोशीने लिहिले आहे. गाण्यात कंगनाचा स्ट्राँग परफॉर्मेंस चाहत्यांना पाहायला मिळाला. राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. कंगना यात लक्ष्मीबाईंची भूमिका साकारत आहे. याचबरोबर अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी यांची महत्त्वाची भूमिका आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.