सप्लिमेंटपासून दूर राहा सांगतोय एव्हरफिट सुनील शेट्टी

shetty
फिटनेस बाबत वयाच्या ५७ व्या वर्षातही यंग जनरेशनला सहज टक्कर देणारा बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी याने फिटनेस आणि आरोग्य याबाबत महत्वाचा सल्ला देताना तरुणवर्गाने सप्लीमेंट पासून दूर राहावे असे सांगितले आहे. त्याच्या मते तुम्ही हार्डकोर अॅथलीट नसाल किंवा स्पोर्ट्सपर्सन नसाल तर तुम्हाला सप्लीममेंट घेण्याचा मुळीच गरज नाही कारण त्यामुळे उलट तुमच्या किडनीला नुकसान होऊ शकते.

सुनील फिटनेस आणि हेल्थ बाबत गुरुमंत्र देताना सांगतो, तुमच्या सवयी चांगल्या असायला हव्यात. नियमित व्यायाम, ट्रेनिंग आणि योग्य आहार हवाच. सुनील स्वतः नाश्ता भरपूर, जेवण बेताचे आणि रात्रीचे जेवण एकदम हलके घेतो. तो म्हणतो फिटनेसमुळे शरीराला एकप्रकारची शिस्त लागतेच पण आत्मविश्वास वाढतो.

सुनील म्हणतो आजकाल फिटनेसबाबत खूप जागृती होते आहे आणि तरुण जिम तसेच अन्य व्यायाम प्रकार मोठ्या संखेने करत आहेत. मात्र त्याचबरोबर सप्लीमेंट घेणे. स्टेरोईड घेणे याचे प्रमाण वाढत चाललेले दिसते. हे तरुणांनी अजिबात टाळले पाहिजे. कारण यामुळे तुम्ही तुमच्या शरीराचे नुकसान करून घेत आहात.

Leave a Comment