टीम इंडियाचा ‘गब्बर’ घेत आहे बासरी वादनाचा आनंद

shikhar-dhawan
गब्बर या नावाने प्रसिध्द असलेला भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवनला आपण क्रिकेटच्या मैदानावर चौकार षटकार मारताना पाहिले आहे. स्टायलिश फलंदाज म्हणूनही तो प्रसिध्द आहे. त्याने फलंदाजीत अनेकदा चूणूक दाखवून भारताला एकहाती सामने जिंकून दिले आहेत. त्याच्यातील आणखी एक कौशल्य नुकतेच समोर आले आहे.


आपल्या इंस्टाग्रामवर शिखर धवनने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तो या व्हिडिओत बासरी वाजवताना दिसून येत आहे. तो बासरी वाजविण्यात एवढा तल्लीन झाला आहे की जणू एका संगीत जाणकाराप्रमाणे तो दिसत आहे. शिखर धवनमध्ये लपलेली ही कला पाहून नेटिझन्सनी देखील कौतुक केले आहे. काहीजणांनी त्याला मुरली मनोहर म्हणाले तर काही जणांनी त्याला क्या बात है गब्बर भाई अशी प्रतिक्रिया दिली. एकदिवसीय मालिकेसाठी शिखर धवन ऑस्ट्रेलियास रवाना झाला आहे.

Leave a Comment